गतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 10 वर्ष सश्रम कारावास

545

गतीमंद मुलीचा गैरफायदा घेऊन बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस 10 वर्ष सश्रम कारावास व 50 हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.

30 ऑक्टोबर 2018 रोजी फिर्यादी पीडित मुलीच्या आजीने पाथरीच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी बाबासाहेब शेळके (रा. बांदरवाडा ता. पाथरी) याने आखाडयावर पाणी पिण्यासाठी व गुरे चारण्याठी म्हणून येऊन मतिमंदत्वाचा फायदा घेवून पीडितेवर अत्याचार केला. यातून पीडित मुलगी पाच महिन्याचे गरोदर राहिली. पीडितेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.

या प्रकरणाचा तपास सेलूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे यांनी केला. यामध्ये सरकापक्षातर्फे 14 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात साक्षीपुराव्यादरम्यान आरोपी बाबासाहेब शेळके (रा. बांदरवाडा ता. पाथरी) या प्रकरणात दोषी आढळला. याप्रकरणी परभणी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानोबा उमाजीराव दराडे यांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरणात वैद्यकीय अहवाल व सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन 16 नोव्हेंबर 2019 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.एस. महाजन यांनी सदर आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावास व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

आपली प्रतिक्रिया द्या