नीचतेचा कळस ! तीन महिन्याच्या गाभण गाईवर लैंगिक अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। हैदराबाद

आंध्र प्रदेशमध्ये नीचतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. पिथापूरम मंडल येथील गोकिवाडा गावात काही नराधमांनी एका तीन महिन्याच्या गाभण गाईवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून आरोपींना लवकरात लवकर पकडा अशी मागणी केली आहे.

नामा राजू असे या गाईच्या मालकाचे नाव असून तो शेतकरी आहे. बी कोथुरु येथे त्याची गोशाळा आहे. त्यात तीन गाई, दोन बैल आहेत. पण रविवारी त्यातील एक गाय गोशाळेत नसल्याचे राजूने बघितले. त्याने गाईची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर एका शेतात झाडाला बांधलेल्या अवस्थेत त्याला गाय आढळली. त्याने तिला पशुवैद्याकडे नेले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे डॉक्टरने सांगितले. त्यामुळे राजू याने पोलिसात तक्रार दाखल केली.

ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चो नेला. यावेळी आरोपींना तात्काळ पकडून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.