पारनेरमध्ये भावाला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

1852
प्रातिनिधिक फोटो

पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. आरोपीने भावास जीवे मारण्याची धमकी देवून पीडित मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ऑगस्ट 2019 ते 15 फेब्रुवारी 2020 रोजी दरम्यान घडलेली आहे. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार आरोपी- अविनाश नवनाथ दरेकर, (रा. पारनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीचा अनेक वेळा पाठलाग करून तिला लग्नाचे आमिष दाखविले. आरोपीस ही मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही मुलीच्या भावास मारण्याची धमकी देऊन तिला नगर येथील लॉजमध्ये बळजबरीने नेले आणि दोन-तीन वेळा तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.

दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चिंचोली येथून बसस्टॉप येथून पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून आळंदी (पुणे) येथे घेऊन जाऊन तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केले. तसेच सदरची बाब कुणाला सांगितली तर भावास मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या