
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबाद मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर तिचा खून करून शेतातच तिचा मृतदेह पुरला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला शवविच्छेदनासाठी पाठवला.
मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या काकाचा अपघात्त झाला होता. याची माहिती देण्यासाठी ती आपल्या वडिलांकडे जात होती. तेव्हा रस्त्यात एका नरधमाने तिला गाठले. तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचाराची कुणाला माहिती मिळू नये म्हणून नराधमाने तिचा खून केला आणि कुठलाही पुरावा राहू नये म्हणून शेतातच तिचा मृतदेह पुरला.
बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. तेव्हा रस्त्यातील एका शेतात नुकतीच जमीन उकरलेली दिसती. घरच्यांना संशय आला आणि त्यांनी जमीन उकरून पाहिली तर मुलीचा मृतदेह आढळला आणि तिचेही कपडेही अस्त्याव्यस्त अवस्थेत आढळले.
त्यानंतर पीडित मुलीच्या पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीचा शोध सुरू आहे.






















































