
सामना प्रतिनिधी । किल्लारी
औसा तालुक्यातील किल्लारी तांडा येथे एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याने तिला रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी मूळ किल्लारी तांडा येथील रहिवासी असून ती रायगड जिल्ह्यातील पारगाव ता. पनवेल येथे वास्तव्यास आहे. ही मुलगी आपल्या गावी ऑगस्ट 2018 मध्ये आली होती. पीडित मुलीच्या घराच्या पाठीमागे राहणाऱ्या 20 वर्षीय वाघ्या नामक तरुणाने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्या घराच्या पाठीमागे सिमेंटच्या बंद असलेल्या घरामध्ये तिच्याशी गोड बोलून तिच्यासोबत शरीर संबध ठेवल्याने ती काही महिन्याची गरोदर राहिली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास किल्लारी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. संदीप कामत हे करीत आहेत.































































