न्यायासाठी बलात्कारापीडितेचा 800 किमी प्रवास, नागपूरमध्ये गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्याय मिळवण्यासाठी बलात्कार पीडित तरुणीने तब्बल 800 किमी प्रवास केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही म्हणून पीडित तरुणी नागपूरमध्ये आली आणि तिने तक्रार दाखल केली आहे.

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. एक 22 वर्षाची नेपाळी तरुणी 2018 साली हिंदुस्थानात कामाच्या शोधात आली होती. लखनौमध्ये तिची ओळख एका मुलीशी झाली होती. दोघी एका खोलीत भाड्याने राहत होत्या. तेव्हा नेपाळी तरुणीने आपल्या मैत्रिणीला दीड लाख रुपये सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. तरुणीच्या मैत्रीणीने व्हिडीओ कॉलवर प्रवीण यादव याच्याशी ओळख करून दिली. प्रवीण मुळचा लखनौचा रहिवासी होता आणि दुबईत सॉफ्टवेअर इंजनीअर म्हणून काम करत होता. काही दिवसांनी तरुणीने आपल्या मैत्रीणीकडे आपले दीड लाख रुपये मागितले. तेव्हा तिच्या मैत्रीणीने पैसे देण्यास नकार दिले तसेच तरुणीला घरातून बाहेर हाकलून दिले.

तरुणीने प्रवीण यादवला सर्व हकीगत सांगितली. तेव्हा प्रवीणने तरुणीला एका हॉटेलमध्ये रुम बूक करून दिली. काही दिवसांनी प्रवीण दुबईहू लखनौला आला आणि हॉटेलरवर तरुणीची भेट घेतली. तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला धमकीही दिली.

नंतर लखनौमधून पळून पीडित मुलगी 800 किमी दूर नागपूरमध्ये आपल्या नेपाळी मित्राकडे आली. त्याच्या मदतीने तरुणीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.