
सामना ऑनलाईन । चंद्रपूर
चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचे (black Panther) दर्शन झाले आहे. रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिनानिमित्त पर्यटक मोठ्या प्रमाणात जंगल सफरीसाठी आले होते. मात्र त्यांना काळ्या बिबट्याच्या दर्शनाचा सुखद आणि दुर्मीळ अनुभव मिळाल्याने पर्यटक भारावून गेले.
ताडोबा-अंधारी व्याघ्र कल्पातील पट्टेदारवाघांसह हा काळा बिबट्या पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरले आहे. गर्द काळ्या रंगाचा बिबट्या अतिशय डौलदार चालीत चालतो. या बिबट्याच्या दर्शनाने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या या बिबट्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जनुकीय बदलामुळे अशा प्रकारच्या काळ्या बिबट्याची पैदास होते.



























































