Astrology । Horoscope । 1 December कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्र 4.39 वाजेपर्यंत आहे, त्यानंतर पुष्य नक्षत्र आहे. तसेच शुक्ल योग आहे. कार्तिक कृष्ण चतुर्थी आहे. पंचागानुसार आज शुभ दिवस आहे. आज वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, कुंभ आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – दुपारी 10.30 ते 12.00 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात होत असल्याने मानसन्मानाचे योग आहेत. घरातील ज्येष्ठांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना आजचा दिवस महत्त्वाचा आहे. व्यवसायिकांसाठीही दिवस लाभदायक ठरेल. एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होताना योग्य ती काळजी घ्या. कोणाशीही गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. कायदेशीर प्रकरणाला सावध राहण्याची गरज आहे. घाई गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्रात तत्परतेने कामे पूर्ण करण्यावर भर द्या. रागावर नियंत्रण ठेवल्यास घरातील वातावरण शांत असेल.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस चांगला ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानातून तृतीय स्थानात होत आहे. त्यामुळे आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळणार आहे, तसेच मानसन्माचे योग आहेत. अचानक लाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रातील वातावरण उत्साहाचे असेल. घरातील वातावरणही आनंदाचे असेल. एखादी मौल्यवान वस्तू भेट मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील कामे विचारपूर्वक करावी लागतील. बराच काळ रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे घरातील वातावरण उत्साहाचे असेल.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानातून द्वितीय स्थानात होणार असल्याने आर्थिक लाभाचे योग आहेत. मालमत्तेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यास चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात सहकार्याचे वातावरण असेल. कार्यक्षेत्रात कौशल्याच्या बळावर प्रभाव निर्माण होणार आहे. व्यवसायात बदल करण्यासाठी घरातील सदस्यांचे मत विचारात घेणे फायद्याचे ठरणार आहे. व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये काटेकोर राहा, कोणावरही विश्वास ठेवल्यास समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण प्रसन्न असेल.

कर्क
कर्क राशीला आज सावध राहण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानातून प्रथम स्थानात होत असल्याने अनेक प्रश्न सुटण्यास सुरुवात होणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. कार्यक्षेत्रात उत्साहाने कामे पार पाडाल. कामाकडे लक्ष देण्यासोबतच आर्थिक आणि बचत योजनांची तजवीज करणे गरजेचे आहे. भविष्यातील गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या, तसेच महत्त्वाचे निर्णय काही दिवसांसाठी पुढे ढकलणे फायद्याचे ठरेल. घरात काही गोष्टींवरून तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानातून व्यय स्थानात होत असल्याने अचानक खर्च उभे ठाकतील. तसेच व्यापारात आणि कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. आजच्या दिवसात हवे त्या वेगाने कामे होत नसल्याने निराशा वाढेल. मात्र, नकारात्मक विचार दूर ठेवण्याची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीची काळजी असेल. त्यामुळे पथ्यपाण्याकडे लक्ष दिल्यास धावपळ होणार नाही. घरात थोडासा तणाव आणि चिंता जाणवेल.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानातून एकादश स्थानात होणार असल्याने कामांचा व्याप वाढला तरी आर्थिक फायदाही होणार आहे. व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना आज चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात कौशल्याने कामे हातावेगळी करावी लागतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणात अनुभवी व्यक्तींचा आणि ज्येष्ठांचा सल्ला फायद्याचा ठरेल. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या प्रयत्न केल्यास त्याचा भविष्यात फायदा होणार आहे. कामानिमित्त छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. लाभाचे प्रमाण चांगले असल्याने घरातील वातावरणही उत्साही असेल.

तूळ
तूळ राशीला आज संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानातून कर्म स्थानात होत असल्याने कामाचा व्याप वाढणार आहे. कामाचा व्याप वाढला तरी सहकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण होणार आहेत. मात्र, विनाकारण दगदग, धावपळ टाळावी. सर्वांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळत असल्याने दिवस आनंदात जाणार आहे. मात्र, आजच्या दिवसात नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याची गरज आहे. अन्यथा विनाकारण चिंतेमुळे कुटुंबिय नाराज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनाही दिवस चांगला असून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानातून भाग्य स्थानात होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी तमी होणार आहेत. उत्साह वाढणार आहे. मात्र, कटु वाणीमुळे घरातील गैरसमज आणि दुरावा वाढणार नाही, याची काळजी घ्या. तसेच कोणत्याही वादात पडणे टाळावे. कार्यक्षेत्रात आळस करू नका, अन्यथा त्यामुळे नुकसान होऊ शकते. तसेच कामे रेंगाळल्याने त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. कोणाशाही बोलताना सावध राहा, अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण संयमाने हाताळल्यास वाद वाढणार नाहीत.

धनू
धनू राशीला आजचा दिवस आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानातून अष्टम स्थानात होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्साहाच्या भरात धावपळ, दगदग करु नका, अन्यथा थकवा जाणावणार आहे. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात दबाव असणार आहे. व्यापार, व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. स्थैर्याची भावना वाढीस लागेल. भागीदारीत व्यवसाय असलेल्यांना काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा चांगला निकाल येण्याची शक्यता असल्याने घरातील वातावरण आनंदी असेल.

मकर
मकर राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानातून सप्तम स्थानात होत असल्याने जोडीदाराची साथ मिळणार आहे. विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही शांत राहणे गरजेचे आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळणार आहे. कामाशी संबधीत गोष्टीत कोणावरही विश्वास ठेवू नका, अन्यथा त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवास फायद्याचा ठरणार आहे. कुटुंबातील कुरबुरी कमी होणार असल्याने घरात खेळीमेळीचे वातावरण असेल.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्र पंचम स्थानातून सहाव्या स्थानात भ्रमण करत असल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. घरातील कामे वाढणार आहेत. तुमच्यात आत्मविश्वास असल्याने कामे वेळेत पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांकडून मदत मिळणार आहे. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल आणि एखाद्या नातेवाईकांची भेट होईल, या भेटीचा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, विनाकारण वादविवाद आणि गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असेल.

मीन
मीन राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानातून पंचम स्थानात होत असल्याने शुभ समाचार मिळण्याचे योग आहेत. घरासाठी काही खरेदी करण्याचे योग आहेत. रखडलेल्या कामांना गती दिल्यास त्या पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रात कशासाठीही जिद्द किंवा हट्टीपणा करू नका, त्यामुळे सहकारी दुखावण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील गॉसिप किंवा गप्पाटप्पांकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. व्यावसायिकांना नव्या संधी किंवा कल्पक योजना मिळतील. त्यामुळे फायदा होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभसमाचार मिळण्याचे योग आहेत. घरातही चांगले वातावरण असेल.