Astrology । Horoscope । 2 December कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – शनिवारी पुष्य नक्षत्र 6.53 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आश्लेषा नक्षत्र आहे. तसेच ब्रह्मा योग आहे. कार्तिक कृष्ण पंचमी आहे. पंचागानुसार आज शुभ दिवस आहे. आज वृषभ, मिथुन, कन्या, मकर आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – सकाळी 9 ते 10.30 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात होत असल्याने घरासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळावे लागले. कुणालाही दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील एखादा वाद मिटण्याची शक्यता आहे. वादविवादाची परिस्थिती निर्माण झाल्यास शांत राहणेच फायद्याचे ठरेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. एखादा शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न असेल.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस चांगला ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानातून तृतीय स्थानात होत आहे. मात्र, भावनिक गोष्टीत सावध राहवे लागेल. नवीन लोकांशी ओळख झाल्याने फायदा होण्याची शक्यता आहे. सृजनात्मक कामात गोडी निर्माण होणार आहे. जोडीदाराच्या करिअरसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना फायदा होणार आहे. कोणताही गुंतवणूक करताना सावधतेने निर्णय घ्या, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण चांगले असेल.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानातून द्वितीय स्थानात होणार असल्याने आर्थिक लाभाचे योग आहेत. मालमत्तेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यास चांगला दिवस आहे. संपत्ती वाढण्याचे आणि घरातील व्यक्तीशी चांगले संबंध निर्माण होणार आहेत. कुटुंबात बराच काळापासून सुरू असलेल्या समस्येवर चर्चेतून मार्ग निघणार आहे. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. नोकरीसोबतच पार्ट टाईम नोकरीची संधी मिळण्याचे योग आहेत. आहार, विहाराकडे लक्ष दिल्यास दिवसभरात उत्साही राहणार आहात.

कर्क
कर्क राशीला आज सावध राहण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानातून प्रथम स्थानात होत असल्याने अनेक प्रश्न सुटण्यास सुरुवात होणार आहे. आज सर्जनात्मक कामात गोडी निर्माण होणार आहे. जीवनशैली सुधारण्यासाठी चांगला दिवस आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक घडामोडींना वेग मिळेल. मात्र, कागदपत्रांमध्ये दक्ष राहून लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे. घराच्या दुरुस्तीसाठी योजना आखू शकता. मात्र, त्यासाठी खर्चाचे नियोजन करावे लागेल. घरातील ज्येष्ठांच्या सल्लाने रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदाचे राहणार आहे.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानातून व्यय स्थानात होत असल्याने अचानक खर्च वाढणार आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती होणार आहे. तसेच घरात छोट्या सहलीचा बेत ठरण्याची शक्यता असल्याने आर्थिक ओढाताण होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी लग्नाचे चांगले प्रस्ताव येण्याचे योग आहेत. सध्याच्या काळात बचतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. घरातील वातावरण समाधानाचे असेल.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानातून एकादश स्थानात होणार असल्याने आर्थिक फायद्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामे करताना स्पर्धेची भावना निर्माण होणार आहे. मात्र, कोणालाही न दुखावता सोबत घेत काम केल्यास त्याचा फायदा होणार आहे. व्यवसायात कोणताही धोका पत्करणे टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक प्रयत्नांना यश मिळणार आहे. करिअरसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यास चांगला दिवस आहे. घरातही उत्साही वातावण असेल.

तूळ
तूळ राशीला आज संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानातून कर्म स्थानात होत असल्याने कामाचा व्याप वाढणार आहे. कार्यक्षेत्रात ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास ते फायद्याचे ठरणार आहे. व्यवसायवाढीच्या योजनांना यश मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रआत आवडीचे किंवा मनासारखे काम मिळत नसल्याने नाराजी राहणार आहे. मात्र, आहे त्या कामातील संधी शोधून फायदा करून घ्यावा लागणार आहे. भावनेवर संयम ठेवल्यास घरातील वातावरण शांत राहण्यास मदत होणार आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानातून भाग्य स्थानात होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी तमी होणार आहेत. तसेच आता नशिबाचीही साथ मिळणार आहे. मोठा प्रवास होण्याची शक्यता आहे. कामात काही अडथळे आले असतील तर कुटुंबियांच्या मदतीने ते दूर हकरता येतील. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन योजनांना गती मिळणार आहे. आध्यात्मिकतेकडे ओढा वाढेल. त्यामुळे मनशांती मिळणार आहे.

धनू
धनू राशीला आजचा दिवस आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानातून अष्टम स्थानात होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस सामान्य असणार आहे. कोणत्याही कामात हट्टीपणा आणि घाई करू नका. विचारपूर्वक पुढे जा. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी कमी होणार आहेत. कार्यक्षएत्रआत कोणावरही विश्वास ठेवू नये, अन्यथा त्यांच्या चुका निस्तरण्यासाठी वेळ द्यावा लागेल. कुटुंबात सहकार्याचे वातावरण असल्याने प्रसन्नता जाणवणार आहे.

मकर
मकर राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानातून सप्तम स्थानात होत असल्याने जोडीदाराची साथ मिळणार आहे. तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात यश मिळेल. मित्रांसोबतचे वाद, गैरसमज दूर होतील. भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. दांपत्य जीवनातील समस्या कमी होणार आहेत. जोडीदार तुमची काळजी घेणार आहे. त्यामुळे संबंधात मधुरता निर्माण होणार आहे. नातवाईकांकडून शुभ समाचार मिळणार असल्याने घरातील वातावरणही आनंदी असेल.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्र पंचम स्थानातून सहाव्या स्थानात भ्रमण करत असल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तसेच उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ साधावा लागेल. खर्च करताना आगामी नियोजन करून खर्च केल्यास अडचणी येणार नाहीत. कौटुंबिक वाद असल्यास ते दूर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल.

मीन
मीन राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानातून पंचम स्थानात होत असल्याने शुभ समाचार मिळण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात नकारात्मक विचार दूर ठेवावे लागतील. तुमच्यातील कलाकौशल्याला वाव मिळणार आहे. महत्त्वाच्या कामांना गती मिळणार आहे. मित्र किंवा कुटुंबियांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी खर्च होणार आहे. मात्र, त्यातून आनंद मिळणार आहे. त्यामुळे घरातील वातावरणही आनंदी असेल.