Astrology । Horoscope । 21 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – मंगळवारी शततारका नक्षत्र असून व्याघात योग आहे. कार्तिक शुद्ध नवमी आहे. कुष्मांड नवमीही आहे. पंचागानुसार आज शुभ दिवस आहे. आज मिथुन, सिंह, तूळ, मकर आणि कुंभ या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – दुपारी 3.00 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. चंद्राचे भ्रमण एकादशस्थानात होत आहे. त्याचा फायदा होणार आहे. कामाचा व्याप वाढल्याने धावपळ करावी लागेल. बांधकाम व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. नवीन प्रकल्पातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळणार आहे. दिवसभर एन्जॉय करण्याचा मूड असेल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, आजच्या दिवसात कर्जाचे व्यवहार टाळावे. तसेच घरातील वातावरणाही आनंदाचे असेल.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस प्रगतीचा असेल. चंद्राचे भ्रमण कर्मस्थानात होत असल्याने नशिबाच्या साथीला कर्माची जोड मिळणार आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन केल्यास ते काम सहज पूर्ण होईल. आज मनोरंजनावर पैसा खर्च होणार आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचा दबाव राहील, त्यामुळे कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कौटुंबिक समस्या जोडीदाराच्या मदतीने दूर होतील, परस्पर संबंध सुधारतील. त्यामुळे घरातील वातावरण समाधानाचे असेल.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस फायद्याचा आहे. चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानात होत असल्याने प्रकृतीत सुधारणा होईल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा बेत आखाल, त्यामुळे कुटुंबातील जिव्हाळा वाढेल. शांततेने कोणतेही काम केल्यास ते लवकर पूर्ण होईल. महत्त्वाचा कौटुंबिक निर्णय घेण्यापूर्वी घरातील जेष्ठांचा सल्ला फायद्याचा ठरेल. व्यावसायिकांसाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज होणारी मित्रांची भेट व्यवसाय वढीसाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवहारात सावध राहा, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

कर्क
कर्क राशीला आजचा दिवस आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अष्टम स्थानात चंद्राचे भ्रमण होत असल्याने आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, तसेच जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक भागीदारासोबत परदेश प्रवासाची शक्यता आहे. तुम्ही सकारात्मक विचार ठेवलात तर आजची कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात प्रगती होण्याचे योग आहेत. कुटुंबासोबत वेळ आनंदात जाईल. मात्र, कोणाचाही नाराजी ओढवून घेऊ नका.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस चांगला जाणार आहे. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानात होणार असल्याने हितशत्रूंच्या कारवाया कमी होतील. तुम्हाला कमी कष्टात जास्त लाभ मिळतील. कार्यक्षेत्रात काही नवीन कामे समोर येतील. त्यामुळे कामाचा व्याप वाढणार आहे. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वास्तुविशारद आणि अभियांत्रिकीसाठी आजचा दिवस यशाचा आहे. वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस सांभाळून राहावे लागणार आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानात होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात अडचणी येण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत संध्याकाळचा वेळ घालवण्याचा आनंद घेतील. त्यामुळे घरातील कामे वाढणार आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रत्येक कामात तुम्हाला घरच्यांचे सहकार्य मिळेल. आज एखाद्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. त्याच्याशी चर्चा केल्याने मन मोकळे होईल.

तुळ
तूळ राशीला आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण पंचम स्थानात होत असल्याने आजचा दिवस सकारात्मक असेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तसेच मुलांकडून शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. प्रकृतीत सुधारणा होणार आहे. वडिलधाऱ्यांच्या मध्यस्तीने कुटुंबातील विसंवाद दूर होईल. कठीण कामे करण्याचा उत्साहा असेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढणार आहे. पैशाच्या बाबतीत शहाणपणाने निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आज कोणाशीही विनाकारण वाद टाळावे लागतील. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानात होत असल्याने घरातील वाद वाढण्याची शक्यता आहे. वेळ तुमच्या अनुकूल असल्याने तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरी किंवा व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. त्यामुळे कामाचा वेग वाढेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. महिलांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मात्र, रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. संयमाने कामे केल्यास घरातील वातावरण समाधानाचे राहील.

धनु
धनू राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानात होणार असल्याने मानसन्मानाचे योग आहेत. व्यवसायाबाबत महत्त्वाच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. भावंडांकडून सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा आणि तज्ंज्ञाचे मत विचारात घ्या. कुटुंबात प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे वातावरण असेल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील.

मकर
मकर राशीला आजचा दिवस फायद्याचा आहे. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानात होणार असल्याने धनलाभाचे योग आहेत. सुख-समृद्धीत वाढ होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कितीही अडथळे आले तरी त्यातून मार्ग निघेल. तुम्हाला पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायात नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास फायदा होईल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. कार्यालयीन कामासाठी प्रवासाचे योग आहेत.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस चांगला आहे. वाढलेले खर्च आता नियंत्रणात येणार आहेत. प्रथम स्थानात चंद्र येणार असल्याने आता मनासारख्या गोष्टी जुळून येतील. मात्र, कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी शॉर्टकट टाळा. व्यावसायिक प्रगतीचे योग आहेत. सर्जनशील कामावर लक्ष केंद्रित कराल आणि काही रचनात्मक काम करण्याचा प्रयत्न कराल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे.

मीन
मीन राशीला आज आर्थिक बाबींची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच कोणतीही जोखमीची आणि महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानात होत असल्याने आज तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात दिवस चांगला जाईल. सहकारी कामात मदत करतील. मात्र, आपल्या कामात सावध राहा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. अध्यात्माकडे कल वाढेल. आर्थिक बाबतीत सावधपणे पुढे जावे लागेल. घरातील वातावरण समाधानाचे असेल.