Astrology । Horoscope । 27 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – सोमवारी कृत्तिका नक्षत्र दुपारी 1.35 पर्यंत आहे. तसेच शिव योग आहे. कार्तिक शुद्ध पोर्णिमा आहे. गुरुनानक जयंती, तुलसी विवाह समाप्ती आणि कार्तिकस्वामी दर्शन दिन आहे. पंचागानुसार आजचा दिवस दुपारी 1.35 नंतर शुभ आहे. आज मेष, वृषभ, कर्क, कन्या, मकर आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – सकाळी 7.30 ते 9.00 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस फलदायी असेल. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानात होत असल्याने आर्थिक समस्या संपण्याचे योग आहेत. घरात एखाद्या शुभ कार्यक्रम होण्याचे योग आहेत. जोडीदारासाठी कपडे, दागिने खरेदी होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात कामे पूर्ण होत नसल्याने अस्वस्थता वाढेल. पैशांची आवक समाधानकारक असल्याने व्यवहारांना गती मिळेल. कोणाशीही अनावश्यक वादात अडकू नका. रियल इस्टेट क्षेत्र आणि प्रॉपर्टी डीलिंगमध्ये चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवल्यास आजचा दिवस चांगला जाणार आहे.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस चांगला ठरणार आहे. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानात होत असल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. कार्यक्षेत्रातील वातावरण उत्साहाचे असेल. सर्जनात्मक कार्यात आवड निर्माण होईल. घरातील वातावरणही आनंदाचे असेल. मात्र, व्यवहासारात सावध राहण्याची गरज आहे. एखाद्या समस्येवर कुटुंबियांशी चर्चा केल्यास त्यातून चांगला तोडगा निघेल. कुटुंबियासोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. चंद्राचे भ्रमण व्यय स्थानात होणार असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. उधारउसनावरा किंवा कर्ज घेणे टाळावे लागेल. कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे, अन्यथा कामाच्या व्यापात अडकून पडाल. घरातील समस्या संयमाने सोडवाव्या लागतील. व्यापार, व्यवसायात आवश्यक ती गती मिळत नसल्याने चिंता वाढेल. मात्र, आधी केलेल्या किंवा हातात असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होणार आहे.

कर्क
कर्क राशीला आज नशीबाची साथ मिळणार आहे. चंद्राचे भ्रमण एकादश स्थानात होत असल्याने अचानक लाभाचे योग आहेत. व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मात्र, कामाच्या व्यापामुळे आजचा दिवस तुम्ही व्यस्त असणार आहात. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामांना गती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तसेच घरातील वातावारणही आनंदी असेल.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण कर्म स्थानात होत असल्याने कामांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आजचा दिवस फायद्याचा असला तरी व्यापारात आणि कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. आज कामे पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. मालमत्तेशी संबंधित वादात यश मिळण्याची शक्यता आहे. आज अनेक संधी मिळणार आहेत. त्या संधीचे सोने करावे लागेल. कुटुंबियासाठी वेळ काढला तर घरातील वातावरणही समाधानाचे असेल.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानात होणार असल्याने नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना आज चांगल्या संधी मिळण्याचे योग आहेत. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये आवड निर्माण होईल. बऱ्याच काळापासून रखडलेल्या योजनांना गती मिळणार आहे. घरात पिकनिकचा बेत ठरण्याची शक्यता असल्याने उत्साहाचे वातावरण असेल.

तूळ
तूळ राशीला आज आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानात होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढला तरी सहकाऱ्यांची साथ मिळणार आहे. मात्र, विनाकारण दगदग, धावपळ केल्यास मनस्ताप वाढणार आहे. कार्यक्षेत्रात आळस झटकून कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यवसायवाढीच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास त्याचा फायदा होणार आहे. आज जोखमीच्या कामांपासून दूर राहा. शेअर बाजारात आणि आर्थिक गुंतवणुकीचा विचार योग्य सल्लानेच करावा. काही नवीन काम करणे पुढे ढकलावे लागेल. आरोग्याच्या समस्यांमुळे कुटुंबियांची चिंता वाढू शकते.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. चंद्राचे भ्रमण सप्तम स्थानात होत असल्याने जोडीदाराची चांगली साथ मिळेल. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना फायद्याचा दिवस आहे. आज दांपत्य जीवन आनंदी राहील तसेच गैरसमज आणि दुरावा दूर होण्याची शक्यता आहे. नेतृत्व क्षमतेला आज वाव मिळणार आहे. करिअरबाबत महत्त्वाचा निर्णय घेता येणार आहेत. विद्यार्थ्यांना दिवस चांगला आहे. कुटुंबियांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी चर्चा केल्यास घरातील वातावरणही सकारात्मक असेल.

धनू
धनू राशीला आजचा दिवस काळजी घेण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानात होत असल्याने कामाचा व्याप वाढणार आहे. तसेच हितशत्रू कारवाया करतील. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाता येईल. मात्र, कोणत्याही शब्दांत अडकू नका. घरातही खेळीमेळीचे वातावरण असेल. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढला तरी कौशल्याने कामे वेळेत पूर्ण होतील, त्यामुळे समाधान मिळेल. व्यवसायात मेहनत घेतल्यास यश मिळणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. पिकनिक किंवा प्रवासाचा बेत असल्यास तो पुढे ढकलणे फायद्याचे ठरेल.

मकर
मकर राशीला आजचा दिवस चांगला आहे. चंद्राचे भ्रमण पंचम स्थानात होत असल्याने शुभसमाचार मिळण्याचे योग आहेत. मुलांसोबत आज वेळ घालवल्यास मिले आनंदित होणार आहेत. त्यामुळे घरातही चांगले वातावरण असेल. दिवसभर धावपळ झाल्याने थकवा जाणवणार आहे. जोडीदाराशी भांडण करणे टाळा. कार्यक्षेत्रात मेहनत घेतल्यास वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांसोबत पिकनिकला जाण्याचा बेत आखू शकतात. मात्र, अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस सकारात्मक असेल. चंद्र चतुर्थ स्थानात भ्रमण करत असल्याने घरासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. अचानक लाभाचे योग आहेत. आजचा दिवस सुख-समृद्धीचा असला तरी कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. घरातील कामे आणि कुटुंबियांच्या आजारपणामुळे चिंता वाढणार आहे. मात्र, घरात वाद टाळणे गरजेचे आहे. घरात गरजेच्या एखाद्या वस्तूंची खरेद करावी लागेल, मात्र, त्यासाठी योग्य बजेट करा आणि त्यानुसारच खरेदी करा. अन्याथा खर्च वाढल्याने समस्या येण्याची शक्यता आहे.

मीन
मीन राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानात होत असल्याने मानसन्माचे योग आहेत. तसेच अनेक योजना दृष्टीपथात येतील. तसेच एखादे नवे काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. रखडलेल्या कामांना गती दिल्यास त्या पूर्ण होणार आहेत. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना केलेल्या कामांचे चांगले फळ मिळणार आहे. कार्यक्षेत्रात मोठे पद किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. घरातून सहकार्य मिळाल्याने कामाचा उत्साह वाढणार आहे.