
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व दैनिक ‘सामना’च्या संपादक सौ. रश्मी ठाकरे यांना वैद्यकीय तपासणीसाठी आज गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रश्मी ठाकरे यांची चार दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार आज त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.
































































