
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीतील एका विद्यार्थीनीने तिच्यावर राष्ट्रपती भवनातील कर्मचाऱ्याने राष्ट्रपती भवनातच बलात्कार केल्याचा आरोप केला आहेत. या प्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. निशांत यादव असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून सध्या तो फरार आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणीला त्याने मंगळवारी रात्री राष्ट्रपती भवनाच्या स्टाफ क्वार्टरमध्ये बोलावले होते. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आश्वासन देत तिच्यावर बलात्कार केला असा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी निशांत विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

























































