86 व्या वर्षी रतन टाटा यांनी बजावला मतदानाचा हक्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

86 वर्षीय उद्योगपती रतन टाटा यांनी सकाळी कुलाबा येथील मतदान पेंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांचे महाव्यवस्थापक शंतनू नायडू त्यांच्या सोबत होते. मतदान पेंद्रातून बाहेर पडताना त्यांनी निवडणूक अधिकाऱयांशी संवाद साधला आणि वृत्तपत्र छायाचित्रकार आणि वृत्तवाहिन्यांना बोटावरील शाई दाखवली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. आपली जबाबदारी ओळखा आणि मतदानाचा हक्क बजावा, असे त्यांनी म्हटले होते.