रतन टाटा ‘आसाम बैभव’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅन्सर रुग्णांवरील उपचारातील योगदानाबद्दल टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘आसाम बैभव’ देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्का शर्मा यांनी गुरुवारी जाहीर केले. आसाम सरकार आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त सहकार्याने आसाममध्ये 19 कॅन्सर केअर युनिट चालविले जातात. या प्रकल्पाचे रतन टाटा यांच्या हस्ते जून 2018 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते. 2 डिसेंबर हा दरवर्षी ‘आसोम दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.