रतन टाटा यांची बायोग्राफी, नोव्हेंबर 2022ला जगभरात प्रसिद्ध होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची बायोग्राफी 2022ला जगभरात प्रसिद्ध होईल. ‘रतन टाटा ः द ऑथरायजड बायोग्राफी बाय डॉ. थॉमस मॅथ्यू’ या बायोग्राफीच्या प्रसिद्धीचे हक्क ‘हार्परकॉलीन्स’ला मिळाले आहेत. यामध्ये टाटा ग्रुपच्या चढत्या आलेखामध्ये रतन टाटा यांनी दिलेले योगदान, त्यांनी अमेरिकेत घालवलेला आपला विद्यार्थी दशेतील कालावधी, त्यांची हिंदुस्थानवापसी यासह त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंचा उलगडा या बायोग्राफीच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे.

रतन टाटा यांनी टाटा समूहाला जागतिक पातळीवर उदयास आणले. टेटली टी, जग्वार लॅण्ड रोव्हर आणि कोरस स्टी यासारख्या कंपन्या त्यांनी घेतल्या. टाटा उद्योगसमूहाला 250 बिलियन डॉलर्सचे भागभांडवल आणि 7 लाख 50 हजार लोकांना रोजगार हिंदुस्थान तसेच जगात नावारूपाला आणले. 100 देशांत कार, ब्लेंड टी, सॉफ्टवेअर हक्क यासह बऱयाच गोष्टी पुरविणारा उद्योग समूह म्हणून टाटाची ओळख रतन टाटा यांनी मिळवून दिली. या सर्व वाटचालीचा लेखाजोखा या बायोग्राफीच्या माध्यमातून मांडला जाणार आहे.