
चिरेखाणीतून चिरे घेऊन निघालेला ट्रक पलटी होऊन तीन कामगार जागीच ठार झाले आहेत. ट्रक चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रत्नागिरी तालुक्यातील नातुंडे जवळ हा दुपारी साडेतीन वाजता अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवारआंबेरे येथून मोरयेवाडीत चिरे घेऊन जाणारा ट्रक नातुंडे येथे पलटी झाला. या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. त्यामध्ये सुधाकर कृष्णा लाखण, अजय अनंत लाखण, गोरख मोहन काळे हे तिघेजण ठार झाले. सुर्यकांत काजवे, यशवंत गोसावी, ओंकार खानविलकर आणि दिलीप नमसळे जखमी झाले आहेत. जखमी अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच शिवसेनेचे विभागप्रमुख किरण तोडणकर, माजी उपसभापती सुनील नावलेसह शिवसैनिकांनी रूग्णालयात धाव घेतली.



























































