रत्नागिरी – क्रेनची मोटरसायकला धडक; एक ठार

मिऱ्या-कोल्हापूर भरधाव वेगाने आलेल्या क्रेनने दुचाकीस्वाराला धडक दिली. याअपघातात दुचाकी चालक प्रकाश विलास गोसावी (वय 30 रा.विमानतळ) हे पुलावरुन खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

परटवणेहून उद्यमनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर क्रेन (क्रमांक एन एल 02 के.5174) जात असताना फिनोलेक्स कॉलनीच्या जवळ चालकाचा क्रेनवरील ताबा सुटला. उतारात हेलखावे खात क्रेन येत असल्याचे दिसताच समोरुन आलेली कार क्रेन (क्रमांक एमएच 08 ए एन 6658) च्या चालकाने कार डाव्या बाजूला रस्त्याच्या खाली उतरवून उभी केली. तोपर्यंत क्रेनने कारला धडक देत पुढील वळणावर गेली. यावेळी समोरुन आलेल्या दुचाकीस्वार प्रकाश विलास गोसावी यांना क्रेनची धडक बसताच ते पुलावरुन खाली कोसळले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव वेगात असलेल्या क्रेनने पुलाच्या एका बाजूचा कठाडा तोडून पुलावरुन खाली उतरली. या अपघातानंतर क्रेन चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. या अपघातानंतर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन रात्री उशिरा क्रेन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या