रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा धोक, नद्यांची पाणी पातळी वाढली; एनडीआरएफचे पथक दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत. झाले असून नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्याने खेड नगरपरिषदेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक चिपळुणात दाखल झाले आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व एनडीआरएफ पुणे कमांडंट यांच्या आदेशानुसार एकूण 20 लोकांचे पथक व एक श्वान पथक चिपळूणमध्ये आज दाखल झालेले आहे. रत्नागिरीत गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे.

चिपळूणातही वशिष्ठी आणि शिवनदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणातील रस्ते जलमय झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.