रत्नागिरीत पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

608
corona-virus-new-lates

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 65 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2213 झाली आहे. रविवारी पाच पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

दापोली येथील एका 43 वर्ष वयाच्या व्यक्तीचा अहवाल ॲन्टीजने टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याने त्याला कळबणी येथे दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा मृत्यु झाला. तसेच दापोली येथील 70 वर्षीय महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. झरीरोड, चिपळूण येथील 64 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच राजिवडा, रत्नागिरी येथील 64 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. मारुती मंदीर, रत्नागिरी येथील 44 वर्षीय रुग्णाचा कोल्हापूर येथे उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता 78 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या