रत्नागिरी – गावडे आंबेरेतील विहिरीत सापडले दोन मृतदेह

रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील विहिरीत दोन प्रोढांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.यादोन्ही मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. आज रविवारी गावडे आंबेरे येथील विहिरीत दोन पुरूषांचे मृतदेह सापडले.त्यापैकी एकाचे अंदाजे वय ४५ तर दुसऱ्याचे अंदाजे वय ५० आहे.विहिरीत मृतदेह सापडल्यानंतर तात्काळ पूर्णगड पोलिसांना कळविण्यात आले.विहिरीत सापडलेल्या मृतदेहामुळे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. विहिरीत सापडलेल्या मृतदेहापैकी एकाच्या अंगावर काळा टिशर्ट आणि चॉकलेटी ट्रॅक पॅन्ट आहे तर दुसऱ्याच्या अंगावर पांढारा टिशर्ट आणि राखाडी ट्रॅक पॅन्ट आहे.