रत्नागिरीत वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस

वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने रत्नागिरीत हाहाकार माजवला आहे़. पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान होत आहे़. आणखी पुढील काही दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार असल्यामुळे नागरीक चिंतेत आहेत़. गेल्या 24 तासात सरासरी 43.33 मिमी पाऊस पडला़. आज दिवसभर संततधार पाऊस सुरुच होता़.

दापोली तालुक्यात मौजे पाजपांढरी येथील भागवत हरिश्चंद्र पावसे यांचे घराचे 15 हजार रुपयांचे, मौजे रिसोली येथे काशिनाथ बाळा जाधव यांच्या घराचे 4,400 रुपयांचे, मौजे शिरसोश्वर येथील बाळाराम रामजी डेवणकर यांच्या घराचे 3,950 रुपयांचे, मौजे रिसोली येथील दिनकर विष्णू जाधव यांच्या घराचे 1600 रुपयांचे, मौजे रिसाडी येथे वसंत काशिनाथ वाजे यांच्या घराचे 2,800 रुपयांचे, मौजे गिम्हवणे येथील चांदणी चंद्रकांत यादव यांच्या घराचे 8,450 रुपयांचे, मौजे माटवण येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीची एका बाजूकडील संरक्षक भिंत पडून 4,500 रुपयांचे नुकसान झाले आहे़.

चिपळूण तालुक्यात मौजे कळकवणे-आकणे-तिवरे येथील रस्त्यावर दरड कोसळली होती़. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दरड हटवण्याचे काम सुरु आहे़. पर्यायी रस्ता आकंळे- कादवड-तिवरे रस्ता चालू आहे़. मौजे टेटव येथील लिंगेश्वर मंदिराची संरक्षक भिंत कोसळून 24 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़. गुहागर तालुक्यात मौजे पडवे येथील समजाद रशिद भिरगावकर यांच्या घराचे 10 हजार रुपयांचे, मौजे अडूर येथील सुरेश काशिनाथ रसाळ यांच्या घराचे 25 हजार रुपयांचे, मौजे पडवे येथील कैसर रमजान शिरगाव यांच्या घराचे 9 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़. संगमेश्वर तालुक्यात मौजे कुचांबे येथील राजू गोविंद काजवे यांच्या घराचे अंशतः, पांगरी येथील सूर्यकांत सागवेकर यांच्या घराचे 5,400 रुपयांचे, मौजे पुरे देवळे बौध्दवाडी येथील सिध्दार्थ पवार यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे़. मौजे तुळसणी येथील जलउदीन अस्ली बोट यांच्या पिण्याच्या पाण्याच्या पक्क्या विहिरीचे 1 लाख 50 हजार रुपयांचे आणि तुळसणी येथील ग्रामपंचायतीजवळील मोरीचे नुकसान झाले आहे़.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.33 मिमी तर एकूण 390 मिमी पावसाची नोंद झाली आहे़ जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे़. त्यामध्ये मंडणगड 75.80 मिमी, दापोली 12.10 मिमी, खेड 77.80 मिमी, गुहागर 30.10 मिमी, चिपळूण 39.80 मिमी, संगमेश्वर 55.90 मिमी, रत्नागिरी 23.90 मिमी, राजापूर 20 मिमी, लांजा 54.60 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे़.

आपली प्रतिक्रिया द्या