
जगप्रसिद्ध ‘देवगड हापूस आंबा’ आता नव्या संकटात सापडला आहे. यावर्षीच्या नव्या हंगामात पहिलाच मोहोर झाडावरच कोळश्यासारखा काळा पडल्याने बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. बदलत्या वातावरणात मोहोर चांगल्याप्रकारे टिकून चांगली फळे मिळण्यासाठी महागड्या कीटकनाशकांच्या फवारण्या केल्यानंतरही गुलाबी थंडीच्या धुक्यात साठलेल्या बुरशीने मोहोरावर आघात करून देवगड तालुक्यातील बागायतदारांच्या मेहनतीला निराशेचा सुरुंग लावला आहे.
बुरशीजन्य रोगाची ही परिस्थिती तालुक्यात प्रथमच उद्भवली असून तालुक्यातील सुमारे ९९ टक्के बागायती या बुरशीजन्य रोगाच्या अधीन आहे. हा मोहोर वांझोटा राहिला. परिणामी, त्यात फंगल इन्फेक्शन झाले. अर्थात बुरशी निर्माण झाली. त्यात तुडतुड्याचे प्रमाणही अधिक राहिले. त्यामुळे हा संपूर्ण मोहोर कोळश्यासारखा काळा बनला. त्यात मोहोर निर्जीव झाल्याने कमी पडली नाही. तालुक्यातील ९९ टक्के बागायतींमध्ये हा प्रकार दिसून आला असून हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. अशा प्रकारातून मोहोराला वाचविण्यासाठी ज्या बागायतदारांनी अथक मेहनत घेतली, त्यांनाही मेहनतीचे फळ मिळाले नाही. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बागायतदारांनी कीटकनाशक फवारणीच्या माध्यमातून विशेष लक्ष दिले होते.
परंतु बुरशीजन्य रोगाने झाडावरील मोहोरच गिळकृत नव्हे, तर चक्क फसवाच निघाल्याने बागायतदार झाल्याने बागायतदार धास्तावले आहेत. चिंताग्रस्त बनले आहेत. तालुक्यातील आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून मोहोर येण्यास सुरुवात होते. त्यास फळधारणा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून होते. यावर्षी नव्या हंगामात आंबा कलमांना चांगल्याप्रकारे मोहोर आला होता. त्यामुळे बागायतदारही खूश होते. हा मोहोर टिकवून चांगली फळे मिळण्यासाठी बागायतदारांनी महागड्या कीटकनाशकांची फवारणीदेखील केली. तसेच यावर्षी थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने लवकरात लवकर फळधारणा होईल, अशी अपेक्षा बागायतदार बाळगून होते.
याबाबत माहिती देताना पडेल येथील प्रगतशील आंबा बागायतदार भूषण बोडस यांनी सांगितले, गेली २५ वर्षे आपण आंबा व्यवसाय करीत असून इतक्या मोठ्या प्रमाणात मोहोर कोळश्यासारखा काळा पडल्याचा प्रकार आपण प्रथमच अनुभवत आहोत. या मोहोरात नर फुलांचे प्रमाण जास्त तर मादी फुलांचे प्रमाण कमी होते. म्हणजेच संयुक्त फुलांचे प्रमाण कमी राहिले होते. फळधारणा होण्यासाठी आवश्यक फुलाचेच प्रमाण कमी राहिल्याने हा मोहोर वांझ राहिला होता. तरीही या मोहोराचे प्रमाण प्रचंड होते. यात दोन ते पाच टक्के जरी फळधारणा झाली असती तरी बागायतदारांचा चांगला फायदा झाला असता. परंतु हा संपूर्ण मोहोर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. परंतु तसे प्रयत्न होताना दिसत नसल्याची खंत बोडस यांनी व्यक्त केली. दरवर्षी नवनवीन संकटे आंबा बागायतदारांना मेडसावत आहेत. परंतु गेल्या २५ वर्षापासून कीटकनाशक फवारणीचे एकच शेड्यूल बागायतदार राबवीत आहेत. यात कोणताही बदल कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, संशोधक अथवा तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून केला गेलेला नाही. त्याचा मोठा परिणाम दरवर्षी आंबा उत्पादनावर झालेला दिसत असल्याचे बोडस यांनी स्पष्ट केले.
कृषी विद्यापीठ-बागायतदार संघटनेत समन्वयाचा अभाव
देवगड तालुक्यातील आंबा बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणात आलेला मोहोर बुरशीजन्य रोगामुळे कार्यरत आहेत. परंतु कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, मोहोर कोळश्यासारखा काळा पडला आहे. बुरशीजन्य रोगामुळे मोहोर नाहीसा झाला. आता पुन्हा नवा मोहोर काही प्रमाणात येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच थंडी व दवाचे प्रमाणही कमी आहे. या मोहोराला कणी सेटींगही चांगले आहे. त्यामुळे हा मोहोर टिकविण्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. कृषी विज्ञापीठाच्या शास्त्रज्ञांकडून संशोधन आवश्यक लहरी व बदलत्या वातावरणामुळे देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांना कायमच मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. तरीही या नुकसानीतून सावरत आंबा बागायतदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतो. यावर्षीच्या नव्या हंगामाच्या सुरुवातीलाच आंबा झाडावरील बुरशीजन्य रोगाबाबत कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाकडून तात्काळ संशोधन होऊन बागायतदारांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
परंतु बागायतदार स्वतःच या परिस्थितीशी सामना करताना दिसत आहेत. कृषी विद्यापीठाने आंबा हंगामात बदलत्या वातावरणात बागायतदारांनी फळझाडांची निगा कशी राखावी? कोणत्या किटकनाशकांचा वापर करावा? आदी माहितीचे मार्गदर्शक बुलेटीन आठवड्यात किमान एकदा प्रकाशित करणे आवश्यक आहे. जेणेकरून या बुलेटीनद्वारे सर्व बागायतदारांना चालू परिस्थितीची माहिती होईल. आंबा बागायतदारांच्या प्रश्नांना शासनदरबारी आवाज उठविण्यासाठी, विविध संघटना संशोधक यांच्याशी बागायतदार संघटनांचा अथवा आंबा बागायतदारांचाही योग्य समन्वय दिसून येत नाही. त्यामुळे समस्यांचे ओझे बागायतदारच एकटा पाठीवर घेऊन वाहत असल्याचे चित्र आहे.
देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आहे. परंतु हा ब्रॅण्ड टिकविण्यासाठी शासनकर्त्यांनीही स्वतः पुढाकार घेऊन बागायतदारांच्या हितासाठी शासनस्तरावर कठोर निर्णय घेणे काळाची गरज आहे. बागायतदार टिकला तरच देवगड हापूसचा ब्रॅण्ड टिकेल.. अन्यथा, दरवर्षी कर्जात डुंबत जाणारा बागायतदार देवगड हापूसच्या उत्पादन निर्मितीपासून दूर होऊन स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काहीसा वेगळामार्ग निवडताना दिसेल.



























































