
लांजा नगर पंचायतीच्या घनकचरा प्रकल्पाविरोधात गेले ७८ दिवसांपासून कोत्रेवाडी ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. या ग्रामस्थांच्या लढ्याला आता युवासेनेने आधार दिला आहे. उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांची युवासेना राज्य सहसचिव प्रद्द्युम्न माने आणि युवासेना जिल्हा युवाधिकारी यांनी भेट देऊन चर्चा केली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरेश करंबळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष हातणकर, युवासेना लांजा तालुका युवाधिकारी अभिजीत शिर्के, महिला लांजा शहर संघटक सिया लोध उपस्थित होते. शिवसेना सचिव, माजी खासदार विनायक राऊत आपल्या पाठीशी ठाम पणे उभे आहेत. या विषया संदर्भात त्यांनी पुन्हा एकदा बैठक बोलवली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा वेळ पडल्यास आपण शिवसेना, नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातूनही हा लढा अधिक तीव्र कसा करता येईल ते पाहु,” असे आश्वासन युवासेना सहसचिव प्रद्द्युम्न माने यांनी दिले.
“माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आपल्या सोबत सुरुवाती पासून आहे. मी ही अनेक बैठकींना उपस्थित होतो. युवासेनेकडून जे जे सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे ते ते सहकार्य आमच्याकडून तुम्हाला मिळेल,” असे आश्वासन युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी यावेळी दिले.
 
             
		





































 
     
    






















