
रत्नागिरी येथील 30 वर्षीय तरुणाचा राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वरुप दयानंद कांबळे असं मयत तरुणाचे नाव आहे. स्वरुप हा रत्नागिरीच्या उमरे कांबळेवाडी गावचा रहिवासी होता. स्वरुपच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील उमरे गावचा रहिवासाी असलेला स्वरूप बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. याशिवाय मोकळ्या वेळात प्लंबिंग आणि घरांचे रंगकाम ही कामंही करत असे. स्वरूपच्या मृत्यूमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. स्वरूप हा एकुलता एक मुलगा असलेला कांबळे कुटुंबाचा आधार हरपला आहे.


























































