#ElectionResults2019 रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत विजयी

2546

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुदेश मयेकर यांचा दणदणीत पराभव करत तब्बल 87147 मतांनी विक्रमी विजयी मिळवला. सलग चौथ्यांदा विजय मिळवताना कोकणातून सर्वाधिक मते मिळविण्याचा पराक्रम केला आहे. मतमोजणीच्या दिवशी पहाटे पासून पावसाने हजेरी लावली. मतमोजणी सुरु होताच महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्यावर मतांचा पाऊस पडला.

महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांना 1 लाख 18 हजार 166 मते मिळाली. काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुदेश मयेकर यांना 31 हजार 19 मते मिळाली. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार राजेश जाधव यांना 1698 मते मिळाली.वंचित आघाडीचे उमेदवार दामोदर कांबळे यांना 4587 मते,बहुजन मुक्ती पक्षाच्या बाळ कचरे यांना 514 मते,अपक्ष संदीप गावडे यांना 2030 मते मिळाली.

महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर भगवा जल्लोष करण्यात आला.विजयी उमेदवार उदय सामंत म्हणाले की, एकूण मतदानाच्या 75 टक्के मतदान मला करून जनतेने मला आशीर्वाद मी सार्थ ठरवेन. रत्नागिरीतील चार जागा महायुतीने जिंकल्या आहेत परंतू दुर्देवाने चिपळूणात महायुतीचे सदानंद चव्हाण यांचा पराभव झाला त्या पराभवाचे आम्ही आत्मपरिक्षण करू असे सांगितले.

#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर

राजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी विजयी

आपली प्रतिक्रिया द्या