
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी निवडणूक होत आहे. या मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 38 हजार 471 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 7 लाख 08 हजार 487 पुरूष आणि 7 लाख 29 हजार 973 महिला मतदार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह म्हणाले की, आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 12 एप्रिल 2024 ते 19 एप्रिल 2024 दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 20 एप्रिल रोजी छाननी होणार आहे. 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 38 हजार 471 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 7 लाख 08 हजार 487 पुरूष आणि 7 लाख 29 हजार 973 महिला मतदार आहेत.
दिव्यांग मतदारांची संख्या 11 हजार 261 आहे. 85 वर्षावरील मतदारांची संख्या 26 हजार 426 आहे. या मतदारसंघात 32 भरारी पथके तैनात ठेवण्यात येणार असून 16 चेकपोस्ट 24 तास सुरू राहतील अशी माहिती त्यांनी दिली.
4151 पोलिसांची गरज – धनंजय कुलकर्णी
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की,निवडणूक प्रक्रियेसाठी 4151 पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे.तितके पोलीस कर्मचारी जिल्ह्यात नसल्याने बाहेर कुमक मागवावी लागेल. 3135 पोलीस बाहेरून मागवावे लागतील तसेच राज्य राखीव दलाची दोन पथके, केंद्रीय राखीव दलाची दोन पथके आणि 2113 होमगार्ड मागवावे लागणार आहेत.सायबर सेल सोशल मिडियावर करडी नजर ठेवणार आहे.जनतेमध्ये मतदान करण्याचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रूट मार्च आणि फ्लॅग मार्च काढणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे व इतर अधिकारी उपस्थित होते.



























































