रत्नागिरी – टेम्पो-रिक्षाचा भीषण अपघात, महिला ठार

रत्नागिरीमध्ये टेम्पो आणि रिक्षाची जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाली आहे. रिक्षेतील दोघा जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फरीदा अब्दुल जिज जिवाजी या मच्छी विक्रीसाठी मासे घेऊन रिक्षातून हातखंबा येथे निघाल्या होत्या. त्यावेळी समोरुन येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मत्यू झाला. या अपघातात रिक्षाचालक असगर अली यूनूस खानही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या