
ऐन फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरीत पावसाची रिमझिम अनुभवायला मिळाली. ढगांचा गडगडाट करत गुरूवारी रात्री साडे आठ वाजता रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात पाऊस सुरू झाला. अवकाळी पावसाने आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. यापूर्वीच लहरी हवामानाचा फटका आंबा, काजूला बसलेला असताना त्यामध्ये अवकाळी पावसाची भर पडली आहे.
आज सायंकाळी अचानक रिमझिम सरी कोसळू लागल्याने अनेकांना भिजतच घरी परतावे लागेल. काही भागात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने रस्ते ओले चिंब होऊन मातीचा सुगंध सुटला होता. काही परिसरात गारांचा पाऊस पडला.




























































