
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे रत्नागिरी- वसई बसला अपघात झाला.बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.हा अपघात आज सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता झाला.
रत्नागिरी ते वसई हि गाडी मुंबई-गोवा महामार्गावरून निघाली होती.महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही.त्यामुळे गाडीची पुढची दोन चाके रस्त्यावरून खाली उतरली.गाडी एका बाजूला कलंडली होती.त्याचक्षणी संकटकालीन दरवाजातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.सुदैवाने कुणीही जखमी झालेले नसल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.