चोंट्याचे लागले कलम, शेवंताने केली आत्महत्या; रात्रीस खेळ चाले अंतिम टप्प्यावर?

2542

रात्रीस खेळ चाले मालिका अंतिम टप्प्यावर आलेली दिसत आहे. मालिकेचे एक वर्तुळ पूर्ण होताना दिसत आहे. मालिकेचा पहिला भाग अण्णा नाईकांच्या मृत्यूने सुरू होते. तर दुसरा भाग हा अण्णा नाईकांच्या कारकीर्दीने सुरू होते.

मालिकेतील अनेक पात्रांचा मृत्यू झाल्यानंतर अण्णा नाईकांचा मुलाच्या लग्नाच्या दिवशीच मृत्यू होतो. मालिकेच्या पहिल्याच भागात मेलेली पात्र अण्णांना दिसतात. त्यात सगळ्यात शेवटी मरते शेवंता.  तर त्यापूर्वी अण्णा चोंट्यांचे कलम लावतात. अण्णा नाईक शेवंताशी लग्न करतात पण तिला पत्नीचा दर्जा देण्यास नाकारतात. तसेच अण्णा आणि शेवंताच्या लग्नाचे पुरावे चोंट्याकडे असल्याने अण्णा त्याचे कलम लावतात. तर अण्णाने पत्नीचा दर्जा न दिल्याने, वाड्यात जागा न दिल्याने शेवंता आत्महत्या करते.

यामुळे मालिकेतील एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. यापुढे अण्णा आणि शेवंताची मुलगी सुसल्या कधी येणार? तिची यावर प्रतिक्रिया काय असणार? तसेच माई तिला घरात घेतात कसे आणि तिला कसे स्विकारतात यावर प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तसेच एका बाजुला शेवंताचा मृत्यू झाला आसतो तर दुसरीकडे सरिता आणि दत्ताला मुलगा झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या