
चेन्नई सुपर किंग्सचे 18 वर्षे मुख्य प्रशिक्षक राहिलेल्या स्टीफन फ्लेमिंग यांनी संघ सोडल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चा तीव्र झाली आहे, पण चेन्नईचा पुढचा प्रशिक्षक कोण असावा, याबाबतचा पर्याय हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू आर. अश्विनने सांगितला आहे.
अश्विन म्हणाला की, ‘फ्लेमिंग आणि धोनी एकमेकांना चांगले ओळखत होते. धोनी कसा विचार करतो हे फ्लेमिंगला माहीत होते, तर धोनीलाही फ्लेमिंगची रणनीती आणि कार्यशैली पूर्णपणे समजली होती. याच कारणामुळे त्यांची भागीदारी इतकी वर्षे यशस्वी ठरली. जर धोनी प्रशिक्षक होण्यास तयार असेल, तर सीएसकेला इतर कोणत्याही नावाचा विचार करण्याची गरज नाही. फ्लेमिंगची जागा घेण्यासाठी तो सर्वात योग्य उमेदवार आहे.’





























































