हिंदुस्थानच्या इंग्लंड दौऱ्याला ग्रहण, रविचंद्रन अश्विन झाला कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे अर्धवट सोडलेली कसोटी क्रिकेट मालिका पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थानी संघ इंग्लंडला रवाना झाला आहे, मात्र या दौऱयालाही कोरोनाचे ग्रहण लागले. कारण अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर आली आहे. क्वारंटाइन असल्यामुळे त्याला टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर रवाना होता आले नाही.

हिंदुस्थान आणि इंग्लंडदरम्यान 1 ते 5 जुलैदरम्यान गतवर्षी राहिलेला पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी 24 जूनपासून हिंदुस्थानी संघ लिसेस्टरशायर येथे चारदिवसीय सराव सामना खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी बहुतेक खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले असून त्यांचा जोरदार सराव सुरू आहे. मात्र कोविड-19 मुळे अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन अजूनही हिंदुस्थानातच आहे. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने ही माहिती दिली. सध्या अश्विन क्वारंटाइन असून त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच तो इंग्लंडला रवाना होणार आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे रविचंद्रन अश्विन लिसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.