वनडे वर्ल्ड कपसाठी अश्विनने निवडला संघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीच्या 2027 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी हिंदुस्थानी संघाच्या तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने या मोठ्या स्पर्धेसाठी आपल्या पसंतीचा संघ निवडला आहे. अनुभव आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्यावर भर देत, अश्विनने काही आश्चर्यकारक निवड केली आहे.

भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनाचे समर्थन

अश्विनच्या संघातील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे, अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे नाव. भुवनेश्वर बऱयाच काळापासून एकदिवसीय संघाबाहेर आहे, पण अश्विनच्या मते दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टय़ांवर स्विंगची गरज भासेल. त्याने सुचवले की, निवड समितीने भुवनेश्वरशी बोलून त्याला देशांतर्गत क्रिकेटच्या माध्यमातून विश्वचषकासाठी तयार करावे. वेगवान गोलंदाजीमध्ये त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि हर्षित राणा यांची निवड केली आहे. अश्विनने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही संघात कायम ठेवले आहे. त्याचा विश्वास आहे की, या अनुभवी खेळाडूंच्या उपस्थितीचा संघाला फायदा होईल.

अश्विनचा वर्ल्डकपसाठीचा संघ

शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, पुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि भुवनेश्वर कुमार.