
सार्वजनिक बँकांच्या वेळेत येत्या 1 नोव्हेंबरपासून बदल करण्यात आला आहे. निवासी क्षेत्रातील बँका, व्यापारी क्षेत्रातील बँका आणि अन्य बँकांच्या वेळा या वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. बँकांच्या कामकाजाची वेळ तीन प्रकारांमध्ये विभागण्यात आली आहे.
इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) गेल्या 6 ऑगस्ट रोजीच यासंदर्भात पत्र जारी केले होते. त्यात बँकांच्या वेळेची तीन प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून केली जाणार आहे.
सार्वजनिक बँकांमध्ये ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा मिळावी म्हणून केंद्र शासनाने बँकांमध्ये सुधारणा केल्या. त्याअंतर्गत सार्वजनिक बँकांच्या वेळा या ग्राहकांना सोयीच्या ठरतील अशा पद्धतीने बदलण्यात आल्या आहेत.
असे असेल बँकांचे वेळापत्रक
- रहिवासी क्षेत्रातील बँकांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 अशी असेल. त्यातील सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंतचा वेळ हा ग्राहकांसाठी असेल.
- व्यापारी क्षेत्रातील कमर्शियल बँकांची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 6 अशी असेल आणि त्यात ग्राहकांसाठी 11 ते 5 अशी सेवा मिळेल.
- इतर बँकांची वेळ सकाळी 10 ते 5 अशी असून संपूर्ण वेळेत ग्राहकांना सेवा मिळणार आहे.

























































