ब्रेकिंग न्यूज : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

6

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्जित पटेल यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहेत. तसेच सरकारसोबत झालेल्या वादानंतर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे उर्जित पटेल यांचा कार्यकाळ हा 2019 मध्ये संपणार होता, परंतु त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि आरबीआयमध्ये वाद सुरू होता. याच वादातून उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला आहे. ‘वैयक्तिक कारणांमुळे मी माझ्या पदावरून तात्काळ पायऊतार होण्याचा निर्णय घेतला’, असे स्पष्टीकरण उर्जित पटेल यांनी राजीनाम्यानंतर दिले आहे. अनेक वर्ष आरबीआयमध्ये करणे ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब होती, असेही ते म्हणाले.

तसेच आरबीआयचे कर्मचारी, अधिकारी आणि मॅनेजमेंटच्या सहकार्याने आणि कठोर मेहनतीमुळे बँकांनी गेल्या काही वर्षात चांगली कामगिरी केली आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो, असेही उर्जित पटेल यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.urjit-patel-statement