500 रुपयांच्या नोटावरून आरबीआयचे स्पष्टीकरण

येत्या 30 सप्टेंबरपासून एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा काढता येणार नाहीत, अशा अफवा काही लोकांकडून सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर भाष्य केले असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे म्हटले आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या एटीएममधील एकूण नोटांपैकी कमीत कमी 75 टक्के असायला हवीत, असेही आरबीआयने म्हटले आहे. 500 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा आरबीआयचा कोणताही विचार नाही, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.