MS Dhoni Handshake: ‘सेलिब्रेशन्स’मुळे धोनीनं हँडशेक टाळलं? RCB खेळाडूंच्या वर्तनावर तज्ज्ञांची नाराजी

ms-dhoni

 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (RCB) शनिवारी चेन्नई सुपर किंग्जवर सनसनाटी विजय मिळवून IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केलं. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाला टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्या शेवटच्या लीग गेममध्ये विजयाची गरज होती आणि एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांनी सामना 27 धावांनी जिंकला.

आरसीबीच्या (RCB) खेळाडूंची वाट पाहिल्यानंतर एमएस धोनी हात न मिळवता मैदानावरून निघून गेल्यानं खेळाडूंच्या सेलिब्रेशनवर थोडी टीका झाली. सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये असं दिसून आलं की ड्रेसिंग रूममध्ये जाण्यापूर्वी धोनीनं सेलिब्रेशन करणाऱ्या आरसीबी खेळाडूंची वाट पाहिली. विराट कोहली त्यानंतर धोनीसोबत बोलण्यासाठी त्याच्या मागे गेला.

क्रिकबझवरील वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉननं धोनीशी हस्तांदोलन करण्यास वेळ न दिल्याबद्दल आरसीबीच्या खेळाडूंना फटकारलं.

हर्षा भोगले देखील म्हणाले की, कोणत्याही प्रसंगात खेळाडूंनी उत्सव सुरू ठेवण्यापूर्वी हस्तांदोलन केलं पाहिजे.

हा सामना धोनीचा आयपीएलमधला शेवटचा ठरू शकतो आणि आरसीबीच्या खेळाडूंना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होईल का, असं वॉननं म्हटलं आहे.