महारेराचे स्मार्ट प्रमाणपत्र, प्रकल्पाची इत्थंभूत माहिती मिळणार! 

यापुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि त्यासोबतचे परिशिष्ट वाचले तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते हे लक्षात घेऊन  ग्राहककेंद्रीत आमूलाग्र  बदल केले आहेत. पूर्वीच्या प्रमाणपत्रात फक्त प्रकल्प आणि प्रवर्तकाचे नाव, पत्ते एका ओळीत दिले जायचे. आता ही माहिती वाचायला सोपी जावी यासाठी बुलेट पॉईंट्समध्ये दिलेली आहे . शिवाय या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ इमारतीचे व विंग्जचे नाव किंवा क्रमांक, प्रकल्पातील निवासयोग्य मजले, प्रकल्पातील निवासी सदनिका आणि अनिवासी गाळ्यांची एकूण संख्या, इमारतीला किती मजल्यांपर्यंत परवानगी मिळालेली आहे, एकूण  पार्ंकगची संख्या हा संपूर्ण तपशील या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात पहिल्यांदाच असणार  आहे.