
गेल्या काही महिन्यांपासून ऑटो क्षेत्रात सुरू असलेली मंदी आणखी गडद होत चालली आहे. सप्टेंबरमध्येही मंदीचेच वातावरण असून वाहनविक्रीचा आलेख घसरत चालल्याचेच उघड झाले आहे. 8 दिवसांवर दसरा आला असतानाही वाहनांची विक्री म्हणावी तितकी होत नसून ऑटो क्षेत्रासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सप्टेंबर 2018 च्या तुलनेत सप्टेंबर 2019 मध्ये मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री 24.81 टक्क्यांनी घटली आहे. याच कालावधीत गेल्या वर्षी कंपनीने 1,53,550 गाडय़ांची विक्री केली होती. तर यावेळी ही विक्री 1,15,452 इतकीच झाली आहे. ह्युंदाई, टाटा, होंडा कार्स इंडियासमोरही मंदीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.




























































