क्रिकेट वर्ल्ड कपचा वर्ल्ड रेकॉर्ड; एक अब्ज 60 कोटी क्रिकेटप्रेमींनी घेतला आनंद

479

यजमान इंग्लंडने लॉर्डस् या क्रिकेटच्या पंढरीत पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. क्रिकेटच्या रणांगणात खेळाडूंनी विक्रम रचल्यानंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिला जाणारा वर्ल्ड कप म्हणून याचा गौरव झाला आहे. या स्पर्धेतील लढतींच्या थेट प्रक्षेपणाद्वारे सरासरी एक अब्ज 60 कोटी क्रिकेटप्रेमींनी आनंद घेतला. हा क्रिकेटविश्वातील नवा विक्रम ठरला.

हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड कपचा उपांत्य सामना रंगला. दोन देशांमधील ही रोमहर्षक लढत दोन कोटी 53 लाख क्रिकेटप्रेमींनी हॉटस्टारवर पाहिली. हिंदुस्थान-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत सर्वाधिक पाहिली गेली. ही लढत टेलिव्हिजनवरून 27 कोटी 30 लाख जनतेने पाहिली. तसेच डिजिटल माध्यमांतून पाच कोटी क्रिकेटप्रेमींनी अनुभवली. 2015 सालामध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड कपच्या तुलनेत या वर्ल्ड कपमध्ये बाजी मारली. सर्वाधिक पाहिल्या जाणाऱया या वर्ल्ड कपमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या