
5 मार्चला सकाळी सवादहा वाजता ओहोटी असताना मुंब्रा खाडीत घडलेल्या घटनेचा आज पुन्हा अॅक्शन रिप्ले झाला. 11 मार्चच्या मध्यरात्रीपासून 12 मार्चच्या सकाळपर्यंत मुंब्रा खाडीत ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्याचा सीन एटीएसने आज रिक्रिएट केला. घटनास्थळी ‘डमी मृतदेह’ ठेवून एटीएसच्या टीमने सूक्ष्म नोंदी घेतल्या. यावेळी फॉरेन्सिक टीम आणि हवामान तज्ञही उपस्थित होते. या सीन रिक्रिएशनमध्ये एटीएस पथकाच्या हाती काय लागले हे मात्र समजू शकले नाही.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एटीएसने अनेक कंगोऱयातून तपास सुरू केला आहे. गेले दोन दिवस त्यांनी हिरेन कुटुंबीयांचा सखोल जाबजबाब नोंदवला. तसेच मनसुख यांचे खाते असलेल्या दोन बँकांमधील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. मात्र तपासात अनेक विसंगती आढळल्याने त्यांची हत्या कशी झाली याबाबत ठोस माहिती समोर येत नव्हती. त्यामुळे अखेर एटीएसने त्यांचा मृतदेह सापडल्याचा सीन पुन्हा रिक्रिएट केला. त्यासाठी फॉरेन्सिक तज्ञ आणि स्थानिक मच्छीमारांचीही मदत घेतली.
असा झाला सीन रिक्रिएट
मनसुख यांच्या हत्येचा सीन रिक्रिएट करताना एटीएसच्या पथकाने हवामानाचा अभ्यास केला. मुंब्रा खाडीचे हवामान, भरती आणि ओहोटी यांच्या नोंदी घेतल्या. ज्या दिवशी 4 मार्चला मनसुख बेपत्ता झाले त्या रात्रीपासून 5 मार्च सकाळपर्यंत हवामान आणि भरती-ओहोटीच्या वेळा या 11 मार्च मध्यरात्रीनंतर 12 मार्चला पहाटेपर्यंत मिळतेजुळते असल्याचा अहवाल हवामान तज्ञांकडून मिळाल्यानंतर 11 मार्चच्या मध्यरात्रीच एटीएसचे पथक मुंब्रा खाडीवर धडकले आणि मनसुख यांच्या मृत्यूचा सीन रिक्रिएट करण्यात आला. मनसुख यांच्या वजनाचा आणि आकारमानाचा एक पुतळा तयार करून तो खाडीत सोडण्यात आला. यावेळी एटीएसचे मुख्य अधिकारी जैजीत सिंह हेही उपस्थित होते. मध्यरात्रीपासून सकाळी 10.30 वाजेपर्यंत हा रिक्रिएशन सीन सुरू होता.
पहाटे 5.20 च्या भरतीकडे लक्ष
4 मार्च रोजी रात्री पावणेबारा वाजता 1.31 मीटरची ओहोटी होती, तर 5 मार्च रोजी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी 3.57 मीटरची भरती होती. त्यानंतर 11.45 वाजता पुन्हा 0.78 मीटरची ओहोटी होती. याची माहिती एटीएसच्या पथकाने घेतली. 5 मार्च रोजी पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी भरती होती. तपासातील अनेक वैंगोऱयांपैकी या वेळेकडे एटीएसचे लक्ष आहे. भरतीचा फायदा घेऊन मनसुख यांचा मृतदेह समुद्रात फेपून दिला असावा आणि सकाळी 10 नंतर ओहोटी सुरू झाल्यावर तो मुंब्रा खाडीच्या किनाऱयावर आला असावा, याची ठोस नोंद घेण्यासाठीच मनसुखचा मृतदेह मिळाल्याचा सीन एटीएसने रिक्रिएट केला.





























































