
भारतीय स्टेट बँकेने क्लर्कच्या एकूण 6 हजार 500 पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पात्र उमेदवार 26 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज भरू शकतात. उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असायला हवे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती बँकेची अधिकृत वेबसाईट Wi.co.in वर देण्यात आली आहे. सर्वसामान्य गट 2255 पदे, अनुसूचित जाती 788, अनुसूचित जमाती 450 पदे, इतर मागासवर्गीय 1179 पदे आणि अन्य मागासवर्गासाठी 508 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.