सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सामना ऑनलाईन ।  मुझफ्फरपूर

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने ‘लवरात्री’ या चित्रपटात  हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत असा आक्षेप घेणारी याचिका मुझफ्फरपूर न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. चित्रपटाचे नाव आणि त्यात दाखविण्यात आलेली अश्लीलता यामुळे हिंदूंच्या भावना दुखावणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी अशी याचिका वकील सुधीर ओझा यांनी दाखल केली.