रेखा जरे हत्या प्रकरण- बाळ बोठे हैदराबादेत सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार, मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अखेर तीन महिन्यांनंतर अटक केली. गेले पाच दिवस पोलिसांची सहा पथके त्याच्या मागावर होती. त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हैदराबाद येथील येथील वकील जनार्दन अपुले हा बोठेला सहारा देत होता. अपुले याने यापूर्वी हैदराबादमध्ये अनेक आरोपींना मदत केल्याची माहिती उघड झाली आहे. बोठे हा अपुले याचे फोन वापरून इतरांच्या संपर्कात राहत होता. ते सर्व फोन पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.