रेखा जरे हत्याकांड – मुख्य आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज नामंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे हत्याकांडप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी बाळ बोठे याचा नियमित जामीन अर्ज संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांनी नामंजूर केला.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी जातेगाव घाटात हत्या झाली होती. याप्रकरणी बोठे याला पोलिसांनी अटक केली होती. बोठे याने नगर जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता.

जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन नामंजूर केल्यानंतर त्याने संभाजीनगर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. मूळ फिर्यादीच्या वतीने वकील नारायण नरवडे आणि वकील सचिन पटेकर यांनी जामीन देण्यास विरोध दर्शविला. बोठे याने रेखा जरे यांचे लोकेशन मारेकऱयांना दिले. हत्याकांडात तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून, बोठे साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. हे म्हणणे न्यायालयाने ग्राह्य धरून बोठेचा जामीन अर्ज नामंजूर केला.