‘मेहंदी वाला घर’ मध्ये नात्यांमधील गुंतागुंत

‘मेहंदी वाला घर’ सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील या मालिकेतील उज्जैनच्या अग्रवाल कुटुंबात या आठवडय़ात काwटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत दाखवली आहे. प्रतिकूल परिस्थितीतदेखील हे कुटुंब एकजूट राहू शकणार का? अशी उत्पंठा प्रेक्षकांच्या मनात उत्पन्न झाली आहे. मालिकेतील कथानक पुढे सरकताना गुंतागुंतीची परिस्थिती उभी राहते. ज्यात मिनीच्या होणाऱया पतीचा म्हणजे विकीचा खरा हेतू उघड होतो. यावेळी राहुल (शहजाद शेख) मिनीचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी जानकी मांच्या विरोधात जाऊनदेखील हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. आपल्या राहुल या व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकताना शहजाद शेख म्हणतो, “एका संयुक्त कुटुंबातील जीवनाशी जुळवून घेण्याचा माझा अनुभव राहुलसारखाच आहे. कोणताही भाऊ आपल्या लहान बहिणीसाठी जे करेल तेच यात दाखवले आहे.’’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9ः30 वाजता दाखवण्यात येते.