जिओ नवा प्लॅन – 2000 जीबीपर्यंत डेटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 रिलायन्स जीओने गिगाफायबर यूजर्ससाठी नवा प्लॅन आणला आहे. यासाठी 101 रुपयांपासून रीचार्ज करता येईल. या रीचार्जच्या माध्यमातून अतिरिक्त 2000 जीबीपर्यंतचा डेटा मिळू शकणार आहे. जेव्हा तुमचा डेटा संपेल तेव्हा या अतिरिक्त डेटाचा वापर ग्राहकांना करता येणार आहे. 101 रुपयांपासून ते 4001 रुपयांपर्यंतचे रीचार्ज केल्यानंतर 2000 जीबी किंवा 2 टीबीपर्यंतचा अतिरिक्त डेटा ग्राहकांना मिळू शकेल. जिओ फायबरचे पेड कस्टमर्स माय जिओ ऍप या कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन रिचार्ज करता येईल.