श्री देव गांगेश्वराचा वार्षिक सप्ताह

सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गवाणे गावचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वराचा सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह 1 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. प्राचीन परंपरा लाभलेल्या गवाणे गावचे श्री शंकराचे रूप अशी ख्याती, या देवस्थानाची दारोम, शिरवली, नाद आणि वाघिवरे या गावांतील चतुःसीमेवरचे जागृत देवस्थान म्हणूनही ओळख आहे. या उत्सवादरम्यान सकाळी 7 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना अखंड हरिनामाला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत स्थानिक वारकरी भजने, त्यानंतर पंचक्रोशीतील भजनांचा कार्यक्रम होणार आहे. मध्यरात्री पौराणिक देखाव्यांसह पालखी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गवाणे ग्रामविकास मंडळ, मुंबई तसेच ग्रामस्थ मंडळी, गवाणे यांनी केले आहे.