
भाजी बनवताना हमखास लागणारा लसूण साठवून ठेवणे मोठे जिकिरीचे काम आहे. लसूण खराब होऊ नये यासाठी काही घरगुती टिप्स आहेत. लसूण जास्त दिवस टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तो योग्य ठिकाणी ठेवायला हवा. लसूण हवेशीर, कोरडय़ा आणि थंड जागेत नेहमी ठेवावा.
लसूण ठेवण्यासाठी जाळीदार टोपली किंवा पेपर बॅग चांगला पर्याय ठरू शकतो. प्लॅस्टिकच्या पिशवीत लसूण ठेवू नये. कारण त्यामुळे आर्द्रता वाढून त्यावर बुरशी येऊ शकते. सोललेला लसूण हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीत ठेवावा. हा डबा फ्रीजमध्ये ठेवल्यास लसूण ताजा राहतो. तसेच लसणावर थोडेसे ऑलिव्ह ऑइल लावून ठेवल्यास त्याचा टिकाऊपणा वाढतो.




























































